ExperienceTokyo.Net in Marathi

जपानमध्ये अनेक वर्षे राहताना रोजच्या आयुष्यात दिसणाऱ्या छोट्या गोष्टी, अनोखी ठिकाणे, ऋतूनुसार बदलणारे शहर, इतिहासाच्या खुणा, छायाचित्रांसाठी सापडलेले वेगळे कोपरे आणि पर्यटकांच्या नेहमीच्या वाटेपेक्षा दूर असलेले अनुभव येथे शब्द आणि छायाचित्रांतून मांडले आहेत.

ExperienceTokyo.net हे फक्त कुठे फिरायचे याची माहिती देणारी वेबसाइट नाही. जपानची ठिकाणे, त्यांचा इतिहास, संस्कृती आणि त्यामागच्या कथा जाणून घेण्याचा हा एक अनुभव आहे.

मी मराठीत लेख प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे. माझे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले आहे, त्यामुळे मराठी ही माझी मातृभाषा असली तरी त्या भाषेवर माझे तितकेसे प्रभुत्व नाही. कृपया ही बाब लक्षात घ्यावी; त्यामुळे कदाचित भाषेच्या दृष्टीने हे लेखन तुमच्या अपेक्षांनुसार नसेल.

मनिष प्रभुणे, टोकियो